धमाल मनोरंजनाचा दुहेरी धमाका

दसरा सरत नाही तो दिवाळीची चाहूल लागते. घरोघरी दिवाळीची जय्यत आणि उत्साहात तयारी चालू झालेली असते. घरआवरणे आणि सजवणे, रांगोळ्या, फराळ, पाहुण्यांची उठबस, एक ना असंख्य कामात आपण व्यस्त असतो.
पण दिवाळी संपल्यावर आता पुढे काय? आता मात्र नुसती धमाल करू या !

SMM घेऊन येत आहे

जयंत भोपटकर दिग्दर्शित, सिॲटल् मधील स्थानिक गुणी आठ कलाकारांच्या संचातील,

हसून हसून पुरेवाट होणार ह्याची खात्री देणारे धमाल विनोदी नाटक

इथे घोटाळला सोटू

सोटू… अरे एक काम धड होत नाही तुझ्याच्यानं. गाईला चारा घाल म्हटलं तर कुत्र्याला घातलास, धोब्याला कपडे द्यायचे ते माळ्याला दिलेस, पॅन्ट शिवताना शर्ट फाडलास, पंखा दुरुस्त करताना दिवे घालवलेस, चहात साखरे ऐवजी मीठ घातलंस, झाडांना पाणी घालायला सांगितलं तर झाडू पाण्यात घालून आलास. कसं आणि किती सांभाळून घ्यायचं तुला? अरे बापरे, आणि आता हे काय नवीन?

काय मंडळी, मग येणार ना आमचा सोटू अजून काय काय गोंधळ घालतो ते बघायला?
Time: 2.30pm PST – 4.00pm PST

==============================================================================

त्या बरोबरच असेल स्थानिक हौशी कलाकार आणि सभासदांचा

विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम.
अर्थात Talent Show

Time: 5.00pm PST – 7.00pm PST

शिवाय मधल्या वेळेत स्वादिष्ट अल्पोपाहार (विकत घेण्यासाठी) उपलब्ध असेल.
तेव्हा नक्की पहायला या.

नाटकाच्या तिकीटासाठी इथे click करा

इथे घोटाळला सोटू - तिकीट

Auditions of talent show will be held on Friday, October 28,2022. We will publish time and venue soon.

Venue: LWHS Performing Art Center,
12033 NE 80th St, Kirkland, WA 98033

Date: November 5th, 2022

 

Date/Time
Sat Nov 05, 2022
2:00 PM to 8:00 PM

Address
LWHS Performing Art Center
12033 NE 80th St
Kirkland, WA 98033

Loading Map....

Leave a Reply