Marathi Shala मराठी शाळा

शिकूया संस्कारातून भाषाजपूया भाषेतून संस्कृती…!

नमस्कार !
अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असलेली आपली मराठी भाषा व पारंपरिक मराठी संस्कृतीचा उत्तम वारसा पुढच्या पिढीस प्रदान करण्याच्या एकमेव उद्देशाने बृहन महाराष्ट्र मंडळ अंतर्गत सिॲटल मराठी शाळेची स्थापना २०२१ साली झाली. या शाळेचे स्वरूप ऑनलाईन तसेच इन पर्सन असे संमिश्र स्वरूपाचे आहे. दर शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजता सिॲटल  मराठी शाळा मायक्रोसॉफ्ट टीम्स वरून ऑनलाईन भरते. या शाळेमध्ये बालवाडी ते पाचवी पर्यंतचे वर्ग असून बृहन महाराष्ट्र मंडळानी आखून दिलेला अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासक्रमामध्ये मराठी वाचन व लेखनासोबत मराठी बोलण्यावर भर दिला जातो. अभ्यासक्रमासोबत मराठी प्रार्थना, श्लोक, गाणी, गोष्टी, कलाकुसर तसेच मराठी खेळही शिकवले जातात. विविध मराठी सण साजरे करण्यासाठी शाळा महिन्यातून एकदा इन पर्सन भरते.
सिॲटल मराठी शाळेचे कुटुंब हे दिवसेंदिवस मोठे होत चालले आहे.शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी झपाट्याने वाढत आहे. २०२२-२३ मध्ये ३२ विद्यार्थी होते, तर २०२५-२६ मध्ये ही संख्या १५० पर्यंत पोहोचली. ही वाढ शाळेच्या गुणवत्तेचा आणि विश्वासार्हतेचा पुरावा आहे.
सिॲटल  मराठी शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. यामध्ये आपले मराठी सण जसे गुढीपाडवा, गणेशोत्सव, हादगा, दसरा , दिवाळी , होळी, रंगपंचमी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरे केले जातात. तसेच वार्षिक स्नेहसंमेलनांतर्गत मुलांना कलागुण सादर करण्याची संधी दिली जाते.
मराठी शाळेतर्फे मुलांसाठी मराठी वाचनालय राबवले जाते. या उपक्रमात मुलांना विविध मराठी गोष्टींची पुस्तके वाचावयास उपलब्ध असतात.
तुमच्या पाल्याला सिॲटल मराठी शाळेच्या कुटुंबामध्ये सहभागी करण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करा.
शाळेचे शुल्क : $१६०
विद्यार्थी नोंदणी साठी खाली दिलेला गूगल फॉर्म भरावा:
शाळेमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायची इच्छा असेल तर खालील गूगल फॉर्म भरावा:

NEW STUDENTS ENROLLMENT GUIDELINE FOR YEAR 2026-27

Thank you for your interest in Seattle Marathi Shala. We are currently accepting Student Interest Forms for new students only. Please complete this form to begin the process.
Student interest form for new students –

https://forms.gle/NeSReFaJAY6JMey2A

We will email you the next steps for enrollment into the 2026–27 academic year, which begins in September 2026.
(Current students should complete the separate Student Registration Form.)
Seattle Marathi Shala is a nonprofit organization offering a hybrid learning model.
Online classes: Three Fridays a month, 5:15 PM – 7:00 PM
In‑person class: Once a month (Current location: Rose Hill Middle School, Redmond — subject to change)
The annual fee is $160, payable at the time of registration.
An 80% attendance requirement applies to both online and in‑person sessions.

Admission Process
Thank you again for your interest in joining our Shala. Admission is subject to availability. This form serves as an initial interest inquiry so we can connect with you.
In mid‑May, we will contact you to schedule an assessment to understand your child’s Marathi proficiency and determine the appropriate grade level. Placement will depend on assessment results and classroom openings.
Once placement is confirmed, you will receive instructions for registration and payment.
If you have any questions, please email shala.info@seattlemm.org.

गेल्या काही वर्षातील कार्यक्रमाची झलक :

If you need further information, please contact us at shalainfo@seattlemm.org

You can view more details of BMM Marathi Shala Program at https://bmmonline.org/marathi-shala