पुढील कार्यक्रम

SMM Guj-goshti (गुजगोष्टी)

            नमस्कार मंडळी, आजकाल म्हणजेच COVID-19 नंतरच्या या जगात जेव्हा आपण एकमेकांची चौकशी करतो तेव्हा एक प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतो तो म्हणजे,' तू आणि तुझ्या कुटुंबातले सगळे बरे आहेत ना'? पूर्वी पण आपण हा प्रश्न नेहमीच विचारला आहे पण आता या प्रश्नामागे बरेच विचार असतात आणि खूप काळजी असते. जगावर आलेलं संकट खूप मोठं आहे यात शंका नाही. सगळेचजण सर्वार्थाने वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांना मदत करत आहेत. या रोगामुळे अनेक गोष्टी बिखरल्या आहेत. अगदी जवळच्या व्यक्ती दूर गेल्याच दुःख, आर्थिक काळज्या आणि जबाबदाऱ्या, एकूणच नकारात्मक वातावरणामुळे मनावर नकळत आलेला ताण अशा अनेक गोष्टी. या सगळ्यात आपलं मन नाजूक अवस्थेतून जात असेल, भावनिक उलाढाली होत असतील, मनाला खूप काही बोलायचं असेल, सांगायचं असेल पण मार्ग मिळत नसेल तर या सगळ्या परिस्थितीला घाबरून न जाता, मनाच्या अवस्थेला स्वीकारून थोडं बोलतं होऊया. आमच्यातर्फे मदतीचा हात पुढे करण्याचा एक छोटासा प्रयत्न. Speakers - Dr. Nitin Karnik is a psychiatrist with over 35 years of experience. He’s worked in both the US and UK, and focuses on both inpatient and outpatient care. Dr. Aparna Raote is a psychiatrist in New Jersey. She…


SMM Annual Picnic

            नमस्कार मंडळी, आम्हाला सांगायला खूप आनंद होत आहेत कि मोठया प्रतिक्षेनंतर आता आपण सगळेजण प्रत्यक्ष भेटणार आहोत ते 'सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या' पुढच्या उपक्रमांत ... अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अशा पिकनिक मध्ये... काय म्हणालात, पिकनिक आली सुद्धा... ? तर हो... २०२१ सुद्धा अर्ध सरलं. खरं  पाहायला गेलो तर दीड वर्षांत आपल्या कोणाचीच नीट अशी भेट  झालेली नाही. त्यामुळे पिकनिक ही  आता आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन भेटण्याचं एक छान निमित्त तर आहेच पण याशिवाय तुम्हा सगळ्यांसोबत धम्माल, मजा-मस्ती, भरपूर गप्पा गोष्टी आणि मस्त गमतीदार खेळ खेळायला आम्ही सगळेच उत्सुक आहोत. पण हो... ही सगळी मजा सगळ्या नियमांचं पालन करून करणार आहोत यात काही शंका नाही. चला तर मग २५ जुलै ही तारीख आपल्या कॅलेंडर मध्ये लिहून ठेवूया. आणि पुन्हा नव्या जोषात आणि उत्साहात आपल्या भेटीगाठी सुरु करूयात. पिकनिक मध्ये वेगवेगळे खेळ आणि अनेकसाऱ्या गोष्टी असणार आहेत पण अजून एक विशेष गोष्ट असेल ती म्हणजे पथनाट्य.  या वर्षी आम्ही पिकनिक मध्ये पथनाटय  आयोजित करत आहोत . पथनाट्य हे ८ ते १० मिनिटांचं असावं. जास्तीत जास्त ७ ते ८ कलाकार एका पथनाट्यामध्ये असू शकतात. हे पथनाट्य पिकनिक मध्ये सादर करायचे असल्यामुळे कोणताही आशावादी आणि सकारात्मक विषय निवडून तुम्ही हे पथनाट्य बसवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की १५ जून पर्यंत कलाकारांची नावं, संपर्क,तुमच्या पथनाट्याचा  विषय events@seattlemm.org वर आम्हाला मेल करायचा आहे. चला तर मग... पथनाट्याच्या तयारीला लागूया. पथनाट्य म्हणजे नेमकं काय? पथनाट्य किंवा स्ट्रीट प्ले हा नाटकाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. पथनाट्य ही फक्त मनोरंजनापर्यंत मर्यादित नसतात तर त्यातून संदेश सुद्धा  पोहोचवला जातो. विशिष्ट सामाजिक वा राजकीय विचार जनमानसात पोचवण्याचे काम ही पथनाट्ये करत असतात. ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात. संदर्भस्रोत-विकिपीडिया आम्ही तुमच्या मेल ची वाट पाहतोय.. आता लवकरचं  भेटूया पिकनिक ला...  


Shop at smile.amazon.com, and Amazon donates to SMM on your behalf, no extra cost to you.

Also, you can directly donate to SMM

झटपट लिंक्स

Membership pays – big events for the year are lined up, buy membership here.

Missed any event, see photos here.

नवीन टिप्पण्या

Recent Comments

Menu