Maitri Melava Day 1

|| वारसा जपू संस्कृतीचा, बंध जोडू मैत्रीचा ||

दिनांक: 22 जुलै, 2023
वेळ: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 7:00
@ Juanita High School, Kirkland
10601 NE 132nd St, Kirkland, WA 98034

SMM आयोजित BMM प्रादेशिक मराठी मैत्री मेळावा दोन दिवस होत आहे.
मैत्री मेळाव्याच्या पहिल्या दिवसाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.

ओरेगॉन मराठी मंडळ  “ही वाट दूर जाते” – सुमधुर संगीताचा कार्यक्रम 10:30 am ते 12:30 pm
मराठी सोसायटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया प्रेमाच्या गावा जावे”  नाटक 2:00 ते 4:00 pm
सिॲटल् महाराष्ट्र मंडळ एक आगळा वेगळा धमाल कार्यक्रम – दूरदर्शन ते समीपदर्शन 5:30 ते 7:30 pm

Buy Tickets Maitri Melava Day 1

तपशीलवार वेळापत्रकासाठी (Event Timeline) इथे क्लिक करा.
मैत्री मेळावा खाद्यमहोत्सव
मैत्री मेळाव्याच्या निमिताने सिऍटल महाराष्ट्र मंडळ प्रथमच महाराष्ट्रीय पदार्थांचा खाद्यमहोत्सव भरवणार आहे. खाद्यमहोत्सवासाठी महाराष्ट्रातील पाच वेगवेगळ्या भागातील खाद्यपदार्थ दुपारच्या जेवणासाठी उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा विचार आहे. हे पाच विभाग आहेत – कोंकण, खान्देश-मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि मुंबई चौपाटी.

मैत्री मेळावा पोशाख संकेत (Dress Code)
भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव गेल्या वर्षी साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर मैत्री मेळाव्यातील तीन मंडळांच्या पेहरावासाठी आपल्या तिरंग्यातील रंगांची निवड केली गेली आहे.- केशरी (सिॲटल् महाराष्ट्र मंडळा), पांढरा (मराठी सोसायटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया ) आणि हिरवा (ओरेगॉन मराठी मंडळ).
आकर्षक सजावट आणि फोटो बूथ
मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब आणि महाराष्ट्राची झलक दाखवणारी सजावट, नाविन्यपूर्ण फोटोंसाठी फोटोबूथ
मैत्री मेळावा Sponsorship
मैत्री मेळाव्यासाठी इच्छुक प्रायोजकांनी (sponsors) इथे संपर्क साधावा -> mm_info@seattlemm.org
मैत्री मेळावा चाईल्ड केअर सुविधा
मैत्री मेळाव्याच्या पहिल्या दिवशी चाईल्ड केअर सुविधा सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:०० ह्या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध असेल. अधिक माहिती: https://www.seattlemm.org/maitri-melava-child-care/