🌼श्री मंगळागौर प्रसन्न🌼
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते
श्रावण आला की सोबत सणवारांची एकामागोमाग रीघ लागलेली असते आणि त्यासोबत असतो नवा उत्साहही. मंगळागौरीचं व्रत आणि त्या वेळी खेळले जाणारे खेळ हादेखील असाच एक उत्साहाचा स्रोत. आपल्या मराठी संस्कृतीचा हा मोठा ठेवा तर आहेच, शिवाय महिलांचं शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य राखण्याचं कामही हे खेळ करतात. आणि म्हणूनच एकेमेकींसोबत मजा करण्यासाठी, नवीन ओळखी करून घेण्यासाठी आणि आपल्यातील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी SMM दरवर्षी मंगळागौर कार्यक्रम आयोजित करतं.
Address
Shirdi SaiBaba Temple, Redmond
18109 NE 76th ST Unit 108
Redmond, WA 98052