Ruchkar Upwas Competition

“रुचकर उपवास” पाककृती स्पर्धा
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल !
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!!!

आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर  “रुचकर उपवास” या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे!

 

आपण नेहमी म्हणतो ना  “एकादशी आणि दुप्पट खाशी”, ते अगदी खरे आहे! आपल्या उपवासाच्या पदार्थांमध्ये खूप विविधता आहे आणि या पदार्थांची चव नेहमीच आपल्या स्मरणात असते. SMM या निमित्ताने तुम्हाला तुमचा आवडता उपवासाचा पदार्थ बनवण्याची कृती सर्वांबरोबर share करायची संधी देत आहे! तुम्ही आम्हाला तुमच्या उपवासाच्या पदार्थाच्या पाककृतीचा व्हिडिओ पाठवावा. आपल्या प्रवेशिका ऑगस्ट 18 पर्यंत स्वीकारल्या जातील. या पाककृतींचे परीक्षण आपल्याच SMM सभासदांमधील तज्ज्ञ परीक्षकांमार्फत केले जाईल. तसेच हे  व्हिडिओ सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या social platforms वर प्रसारित केले जातील (Facebook).

या स्पर्धेतील विजेत्यांना SMM मंगळागौरच्या कार्यक्रमात विशेष पारितोषिक देण्यात येईल!


व्हिडिओ entries@seattlemm.org येथे पाठवावा.

पाककृतींचे नाव, व्हिडिओ मध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचे संपूर्ण नाव, वय, शहराचे नाव हा सर्व तपशील नमूद करावा. आम्ही आपला व्हिडिओ सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या social platforms वर प्रसारित करू (Facebook). व्हिडिओ  पाठवताना कृपया Google Drive Link पाठवावी.

स्पर्धेविषयी सूचना
१. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सिॲटल् महाराष्ट्र मंडळाचे २०२४ सालचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.
२. व्हीडिओची लांबी जास्तीत जास्त ६ मिनिटे असावी.
३. व्हिडिओ मध्ये एखादे छानसे पार्श्वसंगीत वापरावे.
४. व्हिडिओ मध्ये शक्यतो मराठी भाषेत संवाद असावा.
५. व्हिडिओमध्ये साहित्य आणि पाककृतीचा उल्लेख करावा.
६. स्पर्धेसाठी जे व्हिडिओ जमा होतील त्यांचे तज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करण्यात येईल आणि अंतिम विजेते निवडले जातील. विजेते तज्ज्ञ परीक्षक यांचे गुण (७०%) आणि Facebook वरील likes (३०%) यानुसार निवडले जातील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.

तर मग व्हा तयार, करा उपवास, खा सुग्रास! 😋
वेगळी, नाविन्यपूर्ण किंवा पारंपारिक पण वेगळ्या पद्धतीने केलेली उपवासाला चालणारी पाककृती लवकरात लवकर पाठवा.


Date/Time
Sun Aug 18, 2024
All Day

Address


, Map Unavailable

Leave a Reply