मंडळी, गणपती आले आणि या पॅनडेमिक विरुद्ध लढण्यासाठी पाठबळ देऊन गेले. आता दिवाळी येतेय ती हजारो दिव्यांचा लख्ख प्रकाश घेऊन अंधाराला पळवून लावायला आणि त्या नंतर, म्हणजे डिसेंबर महिन्यात आम्ही आरती लोटलीकर आणि ग्रुप च्या साथीने तुमच्यासाठी घेऊन येत आहोत गुरूंचे आशीर्वाद. गुरूंचे गुरु श्री दत्तगुरु!!! दत्तजयंतीच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी “नादब्रह्म” हा खास कार्यक्रम घेऊन येत आहोत.

आपल्या सिॲटल् च्याच आरती लोटलीकर त्यांच्या काही साथीदार कलाकारांबरोबर गेली ९/१० वर्ष हा दत्तजयंतीचा कार्यक्रम अगदी सातत्याने आणि भक्तीने करीत आहेत. २०२० च्या अपरिहार्य परिस्थितीमुळे त्यांच्या या कार्यक्रमात खंड पडू नये, म्हणून सिॲटल् महाराष्ट्र मंडळ पुढे झाले आणि त्यांच्या बरोबर सिॲटल् महाराष्ट्र मंडळच्या फेसबुक लाईव्ह माध्यमातून ही भक्तीची माला अबाधीत राखायचे या वर्षी आम्ही ठरविले आहे. त्यामुळेच यावर्षी तुम्हाला हा कार्यक्रम अगदी घरबसल्या पहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात दत्तगुरूंच्या आणि इतर, अशा भक्तिरसपूर्ण सुंदर, सुरेल गाण्यांमधून आपण दत्तगुरूंना आवाहन करणार आहोत आणि त्याच निमित्ताने, आजूबाजूला आभाळ कितीही दाटून आलं, तरी आपला सूर्य आपण कसा तळपवत ठेवायचा यावरही थोडाफार विचार करणार आहोत. आजूबाजूलाच्या कोलाहलात देखील गुरूंचे स्मरण, त्यांच्या नामाचा जप, त्याचा नाद यातच आपल्याला आपले ब्रह्म गवसते आणि आपल्याला निरंतर, अनंत अशा आनंदाची प्राप्ती होते.

अशाच या नादब्रह्माच्या शोधात आपण निघतोय “नादब्रह्म” या कार्यक्रमात. तेव्हा तारीख आणि वेळ आजच मनात नोंदवून ठेवा आणि आमच्याबरोबर या, भक्तिमार्गाने नामजपाच्या, चिरंतर आनंदाच्या, चैतन्यच्या डोहात अखंड डुंबायला.

तुम्हाला या भक्तिमार्गावर किंवा तुमच्या या सत्याच्या, अनंताच्या शोधात काही विशेष अनुभव आले आहेत का, जे तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करावेसे वाटतात? तसे असेल, तर तुमचा असा अनुभव सांगणारा एखादा छोटासा व्हिडीओ करा आणि तो आमच्याकडे पाठवा (Google Drive, OneDrive or similar). आम्ही तो नक्की आमच्या पेज वर शेअर करू. जेणेकरून सगळ्यांनाच तुमच्या या अनुभवाचा आनंद घेता येईल किंवा त्यातून काही मार्गदर्शनही होऊ शकेल. व्हिडीओ शक्यतो २ मिनिटापेक्षा मोठा नसावा. आम्हाला सगळ्यांनाच तुमचे अनुभव ऐकायला खूप आवडेल.

चला तर मग, भेटूया 19 Dec 2020 रोजी, संध्याकाळी 7:00 वाजता SMM च्या वेबसाईट किंवा फेसबुक पेज वर “नादब्रह्म” या कार्यक्रमात!!!

Send your video!

 

Date/Time
Sat Dec 19, 2020
7:00 PM to 8:30 PM

Address
Seattle Maharashtra Mandal
7345 164th AVE NE SUITE 145 PMB#113
Redmond, WA 98052

Loading Map....

Leave a Reply

Menu