Father’s Day – Online Activity

१६ जुन २०२४ रोजी येत असलेल्या Father’s Day निमित्त सिॲटल् महाराष्ट्र मंडळ आयोजित करत आहे एक गमतीशीर online कार्यक्रम,

“बाबांच्या हाताला पण चव आहे”!

नमस्कार मंडळी,

आपल्या सर्वांच्या मनात आईच्या हातच्या अन्नाविषयी एक हळवा कोपरा असतो. पण बाबांनी केलेली एखादी भन्नाट डिश आपल्या सगळ्यांच्याच कायम लक्षात राहते! या Fathers Day निमित्त आम्ही तुम्हाला अशीच एक संधी देत आहोत!
शोधा एक भन्नाट पाककृती आणि ती आपल्या मुलांबरोबर बनवून एक व्हिडिओ आम्हाला पाठवा. एखादी महाराष्ट्रीय पाककृती असल्यास तर उत्तमच, म्हणतात ना की cherry on top, अगदी तसे!

आणि हो, हि पाककृती बनवताना आईची मदत घ्यायची नाहीये, फक्त बाबा आणि मुले! आई फक्त तुमच्या पाककृतींचे छायाचित्रण आणि परीक्षण करू शकते!
भेळ, पाणीपुरी, दाबेली, रगडा पॅटीस, ढोकळा.. सुटले ना तोंडाला पाणी?
तर मग काय बनवायचे याचा विचार करायला सुरुवात करा आणि पाठवा तुमची चवदार पाककृती!

आम्ही आपला व्हिडिओ सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या social platforms वर प्रसारित करू (Facebook, YouTube, WhatsApp).

 नियम:
१. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सिॲटल् महाराष्ट्र मंडळाचे २०२४ सालचे सभासदत्व असणे बंधनकारक आहे.
२. व्हीडिओची लांबी जास्तीत जास्त ६ मिनिटे असावी.
३. व्हिडिओ मध्ये एखादे छानसे पार्श्वसंगीत वापरावे.
४. व्हिडिओ मध्ये शक्यतो मराठी भाषेत संवाद असावा. 
५. व्हिडिओ च्या शेवटी साहित्य आणि पाककृतीचा उल्लेख करावा.

* व्हिडिओ entries@seattlemm.org येथे पाठवावा.
*  पाककृतींचे नाव, व्हिडिओ मध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचे संपूर्ण नाव, वय, शहराचे नाव हा सर्व तपशील नमूद करावा.
* व्हिडिओ पाठवताना कृपया Google Drive Link पाठवावी.


 

 

 

 

Date/Time
Sun Jun 16, 2024 - Sun Jun 30, 2024
All Day

Address


, Map Unavailable

Leave a Reply