मराठी Music Orchestra – स्वराली

मराठी Music Orchestra – स्वराली

२७ एप्रिल, सिॲटल् महाराष्ट्र मंडळाचा ३१ वा वर्धापनदिन !!
मंडळाचा हा विशेष दिन साजरा करण्यासाठी आमच्याबरोबर आवर्जून उपस्थित रहा – स्वराली २०२४ ह्या बहारदार मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात.

 सिॲटल् महाराष्ट्र मंडळ प्रस्तुत आणि सिॲटल् मधील नावाजलेला ‘स्वराली’ वाद्यवृंद,

तब्बल ८ वर्षांच्या अवधीनंतर, पुन्हा एकदा घेऊन येत आहेत, ३ तासांचा,
मराठी गीतांचा संगीत-आविष्कार – स्वराली २०२४!
* कीबोर्ड, गिटार, ड्रम्स, कॉंगास, तबला, ढोलकी अश्या अनेक वाद्यांना साज चढवणारे वादक,
* संपूर्ण अमेरिकेत प्रसिद्ध असलेले अत्यंत सुरेल गायक,
* जुन्या मराठी चित्रपट गीतांपासून ते आधुनिक मराठी रॉक सॉंग्स पर्यंत सर्वांच्या आवडीची गाणी असणारा हा बहारदार कार्यक्रम आवर्जून अनुभवा!
कार्यक्रमाचे खास आकर्षण: तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी कार्यक्रमाच्या दिवशी दिलेल्या यादीतून गाणे निवडून त्या गाण्याची फर्माईश करू शकता.
खालील 4 श्रेणींमधून गाणी निवडता येतील.
* रोमँटिक  * लोकसंगीत   * भक्तीगीत  * देशभक्तीपर
दिनांक आणि वेळ: एप्रिल 27, संध्याकाळी 5:00 वाजता
स्थळ:  Carco Theater
(प्रवेशदार उघडण्याची वेळ: 4:30 (PM)  वाजता याची कृपया नोंद घ्यावी.)

Date/Time
Sat Apr 27, 2024
4:30 PM to 7:30 PM

Address
Carco Theater
1717 Maple Vly Hwy
Renton, WA 98057

Loading Map....

Leave a Reply