गणेशोत्सव 2022

SMM  गणेशोत्सव आणि गर्जना ढोल-लेझीम पथक मिरवणूक  
Venue: Skyline Highschool, Sammamish
“ढोलचा ठोका आणि लेझीमचा खळखळाट, 
ध्वज संस्कृतीचा नाचवू, टाळ-झांजांच्या गजरात”
लवकरच आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सर्व भक्त गणेशोत्सवाची उत्साहात तयारी करत आहेत. SMM कार्यकारी समितीची सुद्धा जोरदार तयारी सुरु आहे. सजावट, मिरवणूक, महाप्रसाद वगैरे गोष्टी यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी कार्यकारी समितीची लगबग सुरु आहे.
SMM आयोजित गणेशोत्सवाच्या यंदाच्या मिरवणूकीचे खास आकर्षण आहे मुलांचे ढोल-ताशा लेझीम पथक आणि  साथीला आहे –
स्त्रियांचे लयदार लेझीम नृत्य.तर मग ह्या मिरवणूकीत आपल्या लाडक्या गणरायाचे वाजतगाजत, जल्लोषात स्वागत करण्यासाठी आपल्या कुटुंबासह आणि मित्रमैत्रिणींसह नक्की सामील व्हा!आम्ही लवकरच प्रसादाच्या जेवणाच्या कूपन्स ची लिंक open करू.

Catagory
Date/Time
Sun Sep 04, 2022
10:00 AM to 3:00 PM

Address
Skyline High School
1122 228th Ave. SE
Sammamish, WA 98075

Loading Map....

Leave a Reply

Menu