Father’s Day – Online Activity
१६ जुन २०२४ रोजी येत असलेल्या Father’s Day निमित्त सिॲटल् महाराष्ट्र मंडळ आयोजित करत आहे एक गमतीशीर online कार्यक्रम,
“बाबांच्या हाताला पण चव आहे”!
नमस्कार मंडळी,
आपल्या सर्वांच्या मनात आईच्या हातच्या अन्नाविषयी एक हळवा कोपरा असतो. पण बाबांनी केलेली एखादी भन्नाट डिश आपल्या सगळ्यांच्याच कायम लक्षात राहते! या Fathers Day निमित्त आम्ही तुम्हाला अशीच एक संधी देत आहोत!
शोधा एक भन्नाट पाककृती आणि ती आपल्या मुलांबरोबर बनवून एक व्हिडिओ आम्हाला पाठवा. एखादी महाराष्ट्रीय पाककृती असल्यास तर उत्तमच, म्हणतात ना की cherry on top, अगदी तसे!
आणि हो, हि पाककृती बनवताना आईची मदत घ्यायची नाहीये, फक्त बाबा आणि मुले! आई फक्त तुमच्या पाककृतींचे छायाचित्रण आणि परीक्षण करू शकते!
भेळ, पाणीपुरी, दाबेली, रगडा पॅटीस, ढोकळा.. सुटले ना तोंडाला पाणी?
तर मग काय बनवायचे याचा विचार करायला सुरुवात करा आणि पाठवा तुमची चवदार पाककृती!
आम्ही आपला व्हिडिओ सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या social platforms वर प्रसारित करू (Facebook, YouTube, WhatsApp).