Kids Camp Details

“परिक्षा संपली, शाळेला सुट्टी; नाचू, गाऊ, खेळाशी गट्टी
अंगतपंगत, गप्पागोष्टी; मित्रांसोबत दंगामस्ती,
बालमित्रांनो, या रे या ! लवकर भरभर सारे या!  SMM च्या बालशिबिरात मिळून सारे मज्जा करु या.”

 

मुलांसाठी खास घेऊन येत आहोत “उन्हाळी शिबीर ” म्हणजेच Kids Camp. खूप मजा आणि मस्ती सोबतच मुलांना काही नवीन कलागुणांची ओळख करून देण्यात येईल.

Venue: Crossroads Park, Bellevue

 

Schedule (वेळापत्रक) :-

Date: Sunday, June 19th, 2022
Total time 10:00 am to  5.00 pm

  • 9:45 am – Sign up
  • 10:00 am -12:15 pm – Acting workshop (snacks will be served)
  • 12:15 pm – 12:45 pm – Lunch
  • 1:00 pm – 2:00 pm – Writing workshop
  • 2:00 pm – 3:30 pm – Art workshop
  • 3.30 pm – 4.00 pm – Break (snacks will be served during this break)
  • 4:00 pm –  4.45 pm – Performance

Kids will be divided into 2 groups –
Group 1:  
5 to 9 years and Group 2: 10 to 13 years .

Activity 1 – Acting Workshop (अभिनय कार्यशाळा)

“धमाल खेळ खेळूया, अभिनय आणि नाटक शिकूया”
मुलांना हसत खेळत आपल्या समृद्ध नाट्यसंस्कृतीची आणि अभिनयाची तोंडओळख –  By “Xperiments” by सुभग ओक
सुभग ओक: अल्पपरिचय –
2007 मध्ये Xperiments ह्या नाट्यसंस्थेची स्थापना. नाट्यदिग्दर्शक, अभिनेता.
BMM मध्ये अनेक वर्षे सहभाग. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटके, बालनाट्य, एकांकिका सादर केल्या आहेत आणि अनेक नाट्यशाळांचे आयोजन केले आहे.

 

Activity 2 – Writing Workshop (लेखन कार्यशाळा)

 

“शब्दांच्या विश्वात अन गोष्टींच्या राज्यात; चला मारू भरारी कल्पनेच्या साम्राज्यात!”

 

बालमित्रांनो SMM तुमच्या साठी घेऊन येत आहे –   story writing आणि book writing workshop!

ह्या सत्रामध्ये अश्विनी मावशी आणि स्नेहल मावशी तुमच्याशी संवाद साधतील. गोष्टी कशा लिहायच्या, किंवा पुस्तक लेखनाची प्रक्रिया कशी असते याबद्दल त्या तुम्हाला रंजक माहिती देणार आहेत

तुम्हाला जर गोष्टी वाचायला, ऐकायला, आणि लिहायला आवडत असतील तर नक्की या,  workshop ला हजेरी लावा.

अश्विनी देवधर: अल्पपरिचय –
अश्विनी देवधर ह्या एक उत्तम लेखिका असून त्यांचं वाचन ही अफाट आहे. उत्तर अमेरिका मधून प्रकाशित होणारे त्रैमासिक एकता साठी अनेक लेख लिहिलेले आहेत. टोरांटो च्या मराठी मंडळाच्या बातमीपत्रासाठी त्यांनी लेखन केलेले आहे. SMM च्या सारथी अंकामध्ये सुद्धा अनेकदा त्यांचे लेख आणि कविता प्रकाशित झाल्या आहेत. त्या एक उत्तम निवेदक असून अनेक मराठी कार्यक्रमाचे निवेदन त्यांनी स्वतः लिहून सादर केलेले आहे.
स्नेहल कुलकर्णी: अल्पपरिचय –
स्नेहल कुलकर्णी ह्यांनी सुद्धा अनेक मराठी कार्यक्रमांच्या निवेदनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. निवेदनाचे लेखन ही त्याच करतात. Seattle मधील “गुरुकुल ” च्या मराठी शाळेमध्ये त्यांनी अनेक वर्षे मराठी भाषेच्या शिक्षिका म्हणून काम केलेले आहे.

Activity 3 – Art Workshop (कला कार्यशाळा)

“रंगाने हात माखू या, 
छान छान कलाकृती बनवू या.” 

आर्ट आणि क्राफ्ट म्हणजे मुलांच्या आवडीचा धमाल विषय! ह्यात असेल चित्रकला, पेपर क्राफ्ट, फादर्स डे activity वगैरे. मुलांना लागणारे सर्व साहित्य SMM कडून देण्यात येईल. बनवलेल्या वस्तू मुले घरी घेऊन जातील.

मधल्या सुट्टीतील खेळ
विषामृत, मामाचं पत्र हरवलं, खो-खो, पकडा-पकडी वगैरे

 

Fees (प्रवेश शुल्क) 
  • Fees for the members  – $35 for 1st kid and $25 for siblings.
  • Fees for non- members  – $40 for 1st kid and $30 for siblings.

 

अल्पोपाहार आणि जेवण 

  • SMM will provide snacks 2 times.
  • Snacks – Muffins / Goldfish/ animal Crackers / Juice packs / Cheese stick.
  • Kids will bring lunch and their water bottle from home.