Chaitra-Palavi – Swar-Anand by Anand Bhate

इंग्रजी कालगणनेनुसारच्या दिनांक ६ एप्रिल २०१९ रोजी आपले नवीन वर्ष सुरु झाले. “शालिवाहन शके १९४१” शिशिर ऋतू संपून निसर्ग वसंताच्या रंगात न्हाऊ लागला. झाडावेलींना नवी पालवी फुटली. दारोदारी उंच गुढी उभारली. हा नवचैतन्याचा, नाविन्याचा वसंतोत्सव साजरा करण्यासाठी, सिॲटल् महाराष्ट्र मंडळ आयोजित करीत आहे,

चैत्रपालवी

चैत्रपालवीच्या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र जमूया, गुढीला नमन करूया, गप्पागोष्टी मारूया. ठेवणीतल्या साड्या बाहेर निघू द्या. यावेळी बायकांसारखाच, पुरुषांनाही आवरायला जरासा वेळ लागला तरी काही हरकत नाही. शिवाय नवीन वर्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने “शॉपिंग” करायचं असेल तरी अजून बराच वेळ आहे. तेव्हा सगळ्यांनी मस्त नटूनथटून कार्यक्रमाला या. या अशा मंगल वातावरणात गाण्याचा कार्यक्रम असेल तर बहारचं नाही का? म्हणूनच, चैत्रपालवी कार्यक्रमाअंतर्गत मंडळ सादर करीत आहे, सुगम संगीताचा कार्यक्रम

स्वर- आनंद

ज्यांना वयाच्या दहाव्या वर्षीच “आनंद गंधर्व” हा किताब बहाल करण्यात आला, ते आनंद भाटे हे नाव संगीतप्रेमींसाठी नवीन नाही. आनंद भाटेंना प्रत्यक्षात ऐकायला मिळणं, हि जणू पर्वणीच! आनंदजींच्या साथीला आहेत, तबल्यावर भरत कामत आणि पेटीवर सुधीर नायक. स्वर-आनंद या कार्यक्रमात शास्त्रीय आणि सुगम संगीताचा सुंदर मेळ साधलेला आहे. “वद जाऊ कुणाला शरणा गं” सारखी नाट्यगीते, “माझे माहेर पंढरी” सारखे अभंग आणि “चिन्मया सकल हृदया” हे National Award winning गाणं तर या कार्यक्रमात ऐकायला मिळेलच, शिवाय एक अत्यंत “हटके” surprise element हि असणार आहे. हे हटके element काय आहे हे पाहण्यासाठी २१ एप्रिल २०१९ रोजी “स्वर-आनंद” या कार्यक्रमाला नक्की या!

तिकीटविक्री सुरु !!!

Buy your tickets here

कार्यक्रमाची साधारण रूपरेषा
दुपारी ३:०० – प्रवेश सुरु
३:०० ते ४:०० – गप्पागोष्टी, खानपान आणि छापील तिकिटे घेणे.
४:०० ते ५:१५ – स्वर-आनंद पूर्वार्ध
५:१५ ते ५:४५ – मध्यांतर, खानपान
५:४५ ते ७:०० – स्वर आनंद उत्तरार्ध
(***कलाकार मंडळी दुपारी चारच्या सुमारास कार्यक्रम स्थळी येतील.***)

कार्यक्रमाआधी व मध्यांतरादरम्यान खानपानासाठी विविध पदार्थ खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

तिकिटांचे दर खालीलप्रमाणे

*** When you select your seats, please select Member/Non-member/Kids price accordingly from drop down in front of seat numbers, while booking your tickets.
*** Kids rates will apply to kids who are 18 years old or below. 
***Please carry student’s id cards for tickets which are booked using kids rates.

 

Date/Time
Sun Apr 21, 2019
3:00 PM to 7:00 PM

Address
Kirkland Performance Center
350 Kirkland Ave
Kirkland, Washington 98033

Loading Map....

2 Comments. Leave new

Sanket Joshi
April 17, 2019 6:14 PM

What is the lower age limit allowed for a kid ?

Reply
    SMM Webmaster
    April 18, 2019 3:00 PM

    Even though we have not set minimum age limit for kids, we expect that child should be able to enjoy the performance of music maestro Shri Anandji Bhate. Also, as responsible audience it is our duty that our actions won’t hamper the flow of the program or dent others’ musical experience. So we recommend that child should be 5 or above.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu