Dazzling Maharashtra – महाराष्ट्राची सांगीतिक परंपरा.
नमस्कार मंडळी,
आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की येत्या 27 एप्रिल रोजी सिॲटल् महाराष्ट्र मंडळाची स्थापना होऊन 30 वर्षे पूर्ण होतील.
SMM च्या 30 व्या वर्धापनानिमित्त आणि 1 मे रोजी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त सिॲटल् महाराष्ट्र मंडळ घेऊन येत आहे राहुल रानडे यांची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला भव्य दिव्य संगीत सोहळा –
Dazzling Maharashtra – महाराष्ट्राची सांगीतिक परंपरा.
ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षांत मराठी आणि हिंदी कलाक्षेत्रात योगदान दिले आहे अशा नावाजलेल्या दिग्गज मराठी / महाराष्ट्रीय कलाकारांवर आधारित हा कार्यक्रम आहे. मराठी आणि हिंदी गाण्यांसह कार्यक्रमाचा कालावधी (मध्यांतराव्यतिरिक्त) 3+ तासांचा आहे.
ह्या भव्य सांगीतिक सोहळ्यात सहभागी असतील १५ कलाकार – त्यात आहेत झी टीव्हीवरील नावाजलेले संगीतकार आणि सा रे गा मा चे अंतिम फेरीतील गायक.
ह्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्वाची अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिचे उत्कृष्ट निवेदन.
मध्यांतरात चहा आणि अल्पोपाहार विकत घेण्यास उपलब्ध असेल. कृपया जवळ सुटे पैसे (cash) ठेवावेत.
सिॲटल् महाराष्ट्र मंडळाला ३० वर्षे पूर्ण होत आहेत, शिवाय अक्षय तृतीया आणि १ मे ला साजरा होणारा महाराष्ट्र दिन ह्या सर्व दिनांचे औचित्य साधून आपण सर्व जण एकत्र जमून कार्यक्रमाचा आनंद लुटू या. तुम्ही सर्व जण छान नटून थटून या.
मंडळाकडून कार्यक्रमाच्या ठिकाणी सुंदर Dazzling फोटो बूथ असेल.
आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की मंडळाच्या ३० व्या वर्धापनदिना निमित्त ह्या कार्यक्रमात लकी ड्रॉ असेल. तुम्हाला काही आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल, जसे की साडी, स्वतः:चं portrait, गिफ्ट व्हाउचर्स आणि बरंच काही! भाग्यवान विजेते होण्याची ही संधी चुकवू नका.
———————————————————————————————————————————————————————-



लवकरात लवकर आपले तिकीट विकत घ्या आणि ह्या शानदार संगीत सोहळ्यात आमच्याबरोबर सामील होऊन Dazzling क्षणांचे साक्षीदार व्हा !!!.
Buy Dazzling-Maharashtra Tickets
Date: Saturday, 22nd April, 2023 Time: 5:00 pm
Venue: Performing Arts Center – Juanita High School, Kirkland
Address: 10601 NE 132nd St, Kirkland, WA 98034
Sat Apr 22, 2023
5:00 PM to 9:00 PM
Address
Juanita High School, Kirkland
10601 NE 132nd St
Kirkland, WA 98034