एका लग्नाची पुढची गोष्ट

या नाटकाविषयी तुम्ही नातेवाईकांकडून बरेच ऐकले असेल. हे नाटक अमेरिकेत, खरं तर सिॲटल् मध्ये कधी येतंय याची कित्येक जण डोळे लावून वाट बघत बसले असतील. मन्या आणि मनीच्या एका लग्नाची गोष्ट माहिती नाही असा माणूस विरळच. अगदी ती गोष्ट बघितली नसली, तरी त्याबद्दल काही ना काहीतरी कानावर पडलेच असेल. त्या नाटकाचे प्रयोग जेव्हा बंद झाले, तेव्हा मन्या आणि मनी आपल्याला एक वेगळीच रुखरुख लावून गेले. तब्बल १८ वर्षांनी हेच मन्या म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका “प्रशांत दामले” आणि मनी, प्रशांत दामले बरोबर जिची जोडी अधिकच खुलून दिसते अशी  “कविता लाड-मेढेकर” आपल्यासाठी घेऊन येत आहेत,
“एका लग्नाची पुढची गोष्ट.”

काय म्हणता? तुम्ही एका लग्नाची गोष्ट बघितली नाही? हरकत नाही! अहो, ती तुमच्या आमच्या लग्नासारखीच एक गोष्ट होती. मन्या आणि मनीच्या लग्नाला आता वीस पंचवीस वर्ष उलटली आहेत. अजून त्यांचे एकमेकांवर तसेच प्रेम असेल कि ते प्रेम आता आटले असेल, कि वयाबरोबरच प्रेमालाही एक वेगळीच चंदेरी, पोक्त किनार लाभली असेल?
बघायला नक्की या २३ मार्च २०१९ रोजी!
“एका लग्नाची पुढची गोष्ट!!!”

 

Date/Time
Sat Mar 23, 2019
5:00 PM to 9:00 PM

Address
Meydenbauer Center
11100 NE 6th ST
Bellevue, WA 98004

Loading Map....

Leave a Reply