“मराठीचा जागर” – मराठी भाषा दिवस २०२४

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.

२७ फेब्रुवारी  वि. वा. शिरवाडकर अर्थात थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. मराठी भाषा दिन. त्या निमित्ताने आम्ही आणत आहोत एक कार्यक्रम आणि हा कार्यक्रम सादर करणार आहात तुम्ही. तुमच्यातल्या कलाकारासाठी, मराठी भाषा प्रेमीसाठी व्यक्त व्हायची ही एक उत्तम संधी आहे.

चला तर मग, लगेच विचार करायला सुरुवात करा! तुम्ही कोणत्याही विषयावरील मराठीतून सादरीकरण तयार करू शकता. उदाहरणार्थ खालील विषय पाहावेत. •    कविता, कथा, विनोद  •    गायन – भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत, स्फूर्ती गीत, पोवाडा वगैरे •    एकपात्री प्रयोग, लघु नाटिका, मराठी नाटकातील एखादा प्रसंग,•    स्फूर्तिदायी भाषण, एखाद्या विषयावर विचार प्रदर्शन •    मराठी कलाकृतीचे रसग्रहण•    प्रसिद्ध मराठी व्यक्तीचे चरित्र वर्णन•    मराठी भाषेविषयी स्वानुभव

ह्या कार्यक्रमाच्या प्रवेशिका अभूतपूर्व प्रतिसादामुळे बंद करण्यात आल्या आहेत .धन्यवाद !

कार्यक्रमाचा कालावधी मर्यादित असल्याने जागा भरेपर्यंत ज्यांच्या प्रवेशिका येतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
ह्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मंडळाचे सभासदत्व आवश्यक आहे.
सादरीकरण मराठी भाषेत हवे. इतर भाषिक शब्दांचा (हिंदी, संस्कृत, इंग्लिश वगैरे) अनावश्यक वापर टाळावा.
सादरीकरण ५ मिनिटांपेक्षा जास्त नको.
आपली प्रवेशिका काही कारणास्तव अयोग्य वाटल्यास नाकारण्याचा अधिकार मंडळाकडे आहे.

संतवाणी हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम आहे आणि त्यानंतर आपल्यातलेच सभासद भाषेच्या विविध पैलूंवर सादरीकरण करणार आहेत.

मराठी भाषा दिन गौरव दिन साजरा करायला जरूर या.

Marathi Bhasha Divas Registration Form

Date/Time
Sat Feb 24, 2024
3:30 PM to 7:30 PM

Address
Shirdi SaiBaba Temple, Redmond
18109 NE 76th ST Unit 108
Redmond, WA 98052

Loading Map....

Leave a Reply