Sarathi – Rules

दिवाळीचे वेध लागले की मराठी घरांमध्ये फराळ, आकाशकंदील, फटाके यांच्याइतकीच उत्सुकतेने वाट बघितली जाते दिवाळी अंकाची. हीच परंपरा ध्यानात घेऊन SMM या वर्षी घेऊन येणार आहे आपला दिवाळी अंक – सारथी 

‘तुम्ही कथा लिहिता,  कविता रचता? परीक्षण, प्रवासवर्णन इ. लिहिता? अहो मग, तुमच्या लिखाणासाठी हक्काचं व्यासपीठ आहे ‘सारथी’ दिवाळी अंक. तुमच्या सगळ्यांमध्ये दडलेल्या लेखकाला जागं करा. आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयावर लिहायला सुरुवात करा.

या अंकाला वैविध्यपूर्ण बनविण्यासाठी लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, या बरोबरच  मुलाखत, पुस्तक परीक्षण, चित्रपट परीक्षण, संगीत परीक्षण, बालसाहित्य, व्यंगचित्रं, निर्भेळ विनोद, चुटके, स्वतः केलेली पेन्टिंग्ज आणि चविष्ट पाककृती सुद्धा जरूर पाठवाव्यात. साहित्य व कलाकृती अभिरुचीसंपन्न असावी.

सभासदांचे लेखन स्वीकारण्याची अंतिम तारीख – ऑगस्ट २५, २०२५

युवा विभाग: या विभागातआपल्या युवांकडून मराठी आणि इंग्रजी साहित्याची आणि कलाकृतीची अपेक्षा आहे.

पाककृतीसाठी विषय: पारंपारिक पाककृती जी तुमच्या घरात आई, आजी वगैरे बनवत असतील पण आता सध्या फारशी बनवली जात नाही किंवा विस्मृती मध्ये गेली आहे अशी निराळी पाककृती पाठवावी. पाककृती साठी लागणारे पदार्थ अथवा भांडी सहज उपलब्ध होतील अशी असावी. पाककृती बरोबर तिचे छायाचित्र दिल्यास उत्तम!

जाहिराती:  ’सारथी 2024 मध्ये जाहिरात देण्यासाठी  sarathi@seattlemm.org  या पत्त्यावर ईमेलने संपर्क साधावा.

साहित्य पाठवण्याचे नियम

=====================================

  • तुम्ही पाठवलेलं लेखन तुमची स्वतःची निर्मिती असावी. कशावर आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा.
  • अंकासाठी पूर्वप्रकाशित साहित्य पाठवू नये.
  • रुपांतरित किंवा अनुवादित साहित्यावर मूळ लेखकाच्या नावासह तसा उल्लेख असणे आवश्यक आहे.
  • साहित्याच्या निवडीत संपादकांचा निर्णय अंतिम राहील.
  • निवडलेल्या साहित्यात मोजकेपणा, सुस्पष्टपणा आणि शुध्दलेखन यांच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करण्याचा हक्क संपादकांना राहील.
  • प्रत्येक कलाकृती बरोबर स्वतःचं संपूर्ण नाव, ई-मेल पाठवणे आवश्यक.
  • आपलं लेखन  sarathi@seattlemm.org   या पत्त्यावर ईमेलने पाठवा. ईमेलने लेखन पाठवताना MS-Word document फाइल attach करून पाठवावी. फाईल attach करताना फोटो असल्यास ते स्वतंत्रपणे attach करावेत.
  • जास्तीत जास्त २ पाने (back to back) इतपत लिखाण अपेक्षित आहे.
  • इतर कोणत्याही प्रकारची फाईल स्विकारली जाणार नाही.
  • आपलं लेखन पाठवण्यासाठी SMM चे सभासद असणे आवश्यक आहे.