Makar Sankrant 2024

तिळगूळ घ्या गोड गोड बोला! 

संक्रांत म्हणजे दिवाळी संपल्यानंतरचा व नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच येणारा पहिला महत्त्वाचा मराठमोळा सण;
तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण; वाण, हळदी-कुंकू, बोरन्हाण या सगळ्यांचा सण.
आणि SMM चा ही नवीन वर्षातील पहिलाच कार्यक्रम. त्यासाठी मंडळाची तयारी सुरु झालेली आहे. दरवर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा कार्यक्रमात आपल्या सभासदांचे चटपटीत अल्पोपाहाराचे स्टॉल्स असणार आहेत.

13 जानेवारीला नक्की या, आमच्याबरोबर, आपल्या सगळ्यांबरोबर वाण लुटायला, वेगवेगळे गमतीदार खेळ खेळायला आणि मनसोक्त खादाडी करायला. वडापाव, भेळ, सामोसा चाट, मिसळ, दाबेली, पावभाजी, पुरणपोळी, चहा  आणि असे अनेक चविष्ट पदार्थ स्टॉल्सवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. याचबरोबर असेल SMM युवा मंडळाचा स्टॉल. त्यांच्या स्टॉलला जरूर भेट द्या आणि आपल्या गुणी आणि मेहनती युवा मंडळाला प्रोत्साहन द्या.😊

Please keep cash handy for food purchase.

Food vendor stalls registration is closed now.
 सभासदांना संक्रांतीचे वाण मिळेल. 
(Members will receive Sankrant Vaan.)

Date: 13th Jan, 2024
Time: 4:30 pm to 7:30 pm
Venue: Tillicum Middle School
1280, 160th Ave SE, Bellevue, WA 98008

खाद्यपदार्थ स्टॉलधारकांसाठी एक खुशखबर
पदार्थाची चव, उत्कृष्ट सेवा, स्टॉलची कल्पक मांडणी आणि सजावट वगैरे निकषांनुसार ३ स्टॉलधारकांना public judges कडून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक देण्यात येतील आणि SMM कडून बक्षीस मिळेल..

लहान मुलांचे बोरन्हाण आणि नववधू / नवदाम्पत्यांचे तिळवण अर्थात लग्नानंतरची पहिली संक्रांत (1st Sankrant of newly married)

मुख्य हॉलमध्ये असलेल्या मंचावर लहान मुलांना आणि नववधूंना हलव्याचे दागिने घालून फोटो काढता येतील. लहान मुलांना बोरन्हाण पण घालता येईल.

मुलांसाठी वयोमर्यादा – ५ वर्षापर्यंत.

Registration’s accepted until 12th Jan 2024.
Please fill the registration form. (More details on the form)

Bornhan and Tilwan Registration FormDate: Jan 13th 2024