नमस्कार मंडळी,

आम्हाला सांगायला खूप आनंद होत आहेत कि मोठया प्रतिक्षेनंतर आता आपण सगळेजण प्रत्यक्ष भेटणार आहोत ते ‘सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या’ पुढच्या उपक्रमांत … अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अशा पिकनिक मध्ये…

काय म्हणालात, पिकनिक आली सुद्धा… ?

तर हो… २०२१ सुद्धा अर्ध सरलं.

खरं  पाहायला गेलो तर दीड वर्षांत आपल्या कोणाचीच नीट अशी भेट  झालेली नाही. त्यामुळे पिकनिक ही  आता आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन भेटण्याचं एक छान निमित्त तर आहेच पण याशिवाय तुम्हा सगळ्यांसोबत धम्माल, मजा-मस्ती, भरपूर गप्पा गोष्टी आणि मस्त गमतीदार खेळ खेळायला आम्ही सगळेच उत्सुक आहोत.

पण हो… ही सगळी मजा सगळ्या नियमांचं पालन करून करणार आहोत यात काही शंका नाही.

चला तर मग २५ जुलै ही तारीख आपल्या कॅलेंडर मध्ये लिहून ठेवूया. आणि पुन्हा नव्या जोषात आणि उत्साहात आपल्या भेटीगाठी सुरु करूयात.

पिकनिक मध्ये वेगवेगळे खेळ आणि अनेकसाऱ्या गोष्टी असणार आहेत पण अजून एक विशेष गोष्ट असेल ती म्हणजे पथनाट्य.  या वर्षी आम्ही पिकनिक मध्ये पथनाटय  आयोजित करत आहोत .

पथनाट्य हे ८ ते १० मिनिटांचं असावं.

जास्तीत जास्त ७ ते ८ कलाकार एका पथनाट्यामध्ये असू शकतात.

हे पथनाट्य पिकनिक मध्ये सादर करायचे असल्यामुळे कोणताही आशावादी आणि सकारात्मक विषय निवडून तुम्ही हे पथनाट्य बसवू शकता.

फक्त त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की १५ जून पर्यंत कलाकारांची नावं, संपर्क,तुमच्या पथनाट्याचा  विषय events@seattlemm.org वर आम्हाला मेल करायचा आहे.

चला तर मग… पथनाट्याच्या तयारीला लागूया.

पथनाट्य म्हणजे नेमकं काय?

पथनाट्य किंवा स्ट्रीट प्ले हा नाटकाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे.

पथनाट्य ही फक्त मनोरंजनापर्यंत मर्यादित नसतात तर त्यातून संदेश सुद्धा  पोहोचवला जातो.

विशिष्ट सामाजिक वा राजकीय विचार जनमानसात पोचवण्याचे काम ही पथनाट्ये करत असतात. ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात.

संदर्भस्रोत-विकिपीडिया

आम्ही तुमच्या मेल ची वाट पाहतोय..

आता लवकरचं  भेटूया पिकनिक ला…

 

Date/Time
Sun Jul 25, 2021
10:00 AM to 2:30 PM

Address
Beaver lake park
25101 SE 24TH STREET
Sammamish, WA 98075

Loading Map....

1 Comment. Leave new

  • नमस्कार, सिॲटल् महाराष्ट्र मंडळाची २५ जुलै २०२१ ची पिकनिक फक्त सभासदांसाठी आहे की नविन लोकंही सहभागी होऊ शकतात? मी सिॲटल् महाराष्ट्र मंडळाची सभासद नाहिये पण मी इथे नविन असल्याने मला या पिकनिकला येऊन नव्या ऒळखी करुन घ्यायला आणि सभासद व्हायलाही आवडेल. कृपया सांगावे.

    Reply

Leave a Reply