गणपती बाप्पा मोरया!!!

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला लाडका बाप्पा येतोय आपल्याला भेटायला. चला, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं लेझीम ढोल ताशांच्या गजरात स्वागत करूया ८ सप्टेंबर २०१९ ला. 

कार्यक्रमाची ढोबळ रूपरेषा (rough timeline)

11:00 to 12:00 – Rangoli competition – रांगोळी स्पर्धा 

10:00 – Welcome Procession – लेझीम, ढोल ताशांसकट बाप्पाचे जंगी स्वागत

10:30 to 11:30 – Puja – बाप्पाचे मनोभावे पूजन

11:00 – अथर्वशीर्ष पठण 
(पूजा झाल्यावर लगेच पठणास सुरवात होईल. 11:00 ही साधारण वेळ देत आहोत.)  

12:00 – आरती

11:30 to 2:30 – Lunch – सुग्रास मराठी भोजन

3:00 to 6:30 – Cultural program – श्री.चारुदत्त आफळे यांचे कीर्तन

6:30 to 7:00 – Puja and immersion – उत्तरपूजा, आरती आणि विसर्जन 

You are welcome for “Darshan” at any time on the event day.

Entry for “Keertan” is free. Please note that those who have bought food coupons will enter the auditorium first.

कीर्तन या प्रकाराशी नवीन पिढीची ओळख व्हावी, या हेतूने आम्ही कीर्तन निःशुल्क (free) ठेवले आहे परंतु, ज्यांनी फूड कूपन्स घेतली आहेत, त्यांना कीर्तनासाठी आत जाताना प्राधान्य देण्यात येईल. 

लेझीम, ढोल-ताशे 
बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही येणार हे माहीतच आहे, पण बाप्पाच्या स्वागतासाठी आमचा लेझीमचा सराव जोरदार चालू आहे. या मिरवणुकीत सामील व्हायला सकाळपासूनच नक्की या. 
ढोल ताशा पथक : BeatsOfRedmond is joining us to perform in front of bappa with their special performance.

मखर आणि आरास 
बाप्पांना विराजमान करण्यासाठी सुंदरशी आरास देखील तयार होत आहे. ती नेमकी कशी असेल हे बघायला या.  

अथर्वशीर्ष पठण 
गणपती पूजेच्या वेळी अथर्वशीर्षाचे पठण होणार आहे. तुम्हाला अथर्वशीर्ष येत असल्यास म्हणायला या आणि येत नसल्यास, ऐकून, शिकायला या. एकत्र जमून केलेले मंत्रोच्चार किती परिणामकारक असतात, मनाला किती शांतता देऊन जातात, याचा अनुभव आपण घेतला आहेच, आपल्या मुलांना देखील तो देऊया. 

रांगोळी स्पर्धा 
तुम्हाला छान रांगोळी काढता येते का? अहो मग सगळ्यांना बघुद्या कि तुमची कला. गणपतीच्या दिवशी आम्ही रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे. नक्की भाग घ्या. त्यासंबंधीची इतर माहिती पहा इथे. 
https://docs.google.com/forms/d/1EjwZiCeVqcOqaIs8-NZdcJ5Zwm_CmM8cZV-ai6M4uvo
तुम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास, ६ सप्टेंबर पर्यंत वरील गूगल फॉर्म भरा. 

भोजन 
एवढा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम, मग पोटापाण्याची काय सोय, असा प्रश्न पडलाय का तुम्हाला? भरगच्च कार्यक्रमांच्या जोडीला ताटात चटकदार, चविष्ट, चमचमीत पदार्थांची रेलचेल ही आहेच!

Food items
वरण भात साजूक तूप 
बटाट्याच्या भाजीला रस्सा खूप 
टपोरे काळे चणे मस्त 
नुसतं लोणचंच नका करू फस्त 
टरटरीत फुगलेल्या पुरीची साथ
मागोमाग ताटात मसालेभात 
चमचमीत बटाटवडे इवलुले 
उकडीचे मोदक तुपात न्हालेले. 
सगळं झाल्यावर थंडगार मठ्ठा 
अजून आहे एक गोड सरप्राईज, ते सांगत नाही अत्ता 

कीर्तन 
गणेशोत्सवाच्या निमित्ताने या वेळी आम्ही एक वेगळा कार्यक्रम घेऊन येत आहोत. 
आफळेबुवा, म्हणजेच श्री चारुदत्त आफळे यांचे कीर्तन. 
ऐतिहासिक किंवा पौराणिक गोष्टींची उकल, आफळेबुवांच्या मधुर आवाजात, आजच्या संदर्भात, जाणून घेणे म्हणजे आजी आजोबांचा हात धरून पुन्हा एकदा देवळात जाऊन बसणे. त्यावेळी नकळत मनावर जे संस्कार झाले, त्यांची कदाचित आता नव्याने आठवण होईल. किंवा त्यावेळची तत्व आजच्या काळात तग धरून राहू शकतात कि नाही, किंवा त्यांना मुरड घालायची झालीच, तर कशी आणि कितपत, अशी जी कधीकधी मनाची घालमेल होते, त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करूया. कीर्तन म्हणजे काय, तत्वज्ञानासारखा कठीण विषय गप्पागोष्टींमधून कसा साधा सोप्या भाषेत, कीर्तनाच्या माध्यमातून समजावून देता येतो, याचा अनुभव आपल्या पुढच्या पिढीलाही देऊया. पुढच्या पिढीलाही बोट धरून देवळात घेऊन जाऊया. 

विज्ञानाचा आधार दिलाच आहे आता श्रद्धेचा ठेवा देऊया.

Volunteering
We need volunteers for this event. Those who are interested, please connect with EC members (people with orange batch) on arrival.

Vendor Booths
We are accepting vendor booths for the Ganapati event. Limited spots available. Hurry up and get your spot. Please use below link to pay for booth.
https://www.seattlemm.org/smm-advertisements

 

Date/Time
Sun Sep 08, 2019
10:00 AM to 6:00 PM

Address
Mercer Island High School
9100 SE 42nd St,
Mercer Island, , WA 98040

Loading Map....

12 Comments. Leave new

  • When the ticket sale is going to start

    Reply
  • Vaishali Joshi
    August 29, 2019 10:58 PM

    Hi,
    I’d love to Volunteer for any event that you need help with. Are you planning to organize nashik/punheri dhol kinda music? My email is vaishalijoshi0022@gmail.com and phone number 425.283.3135

    Reply
    • SMM Webmaster
      August 30, 2019 7:22 PM

      Vaishali, thank you for reaching out and offering to volunteer. When you arrive at venue, please connect with EC members (people with orange batch) and they will guide you further.

      Reply
  • Do I need to buy the membership first, to attend the Ganesh festival?

    Reply
    • SMM Webmaster
      August 30, 2019 7:21 PM

      No, you can attend in any case. Food coupon rates are different for members and non-members though. Also, there are many other benefits associated with membership, so we suggest you to get it. But it’s not a must for Ganapati event.

      Reply
  • We do not get your announcemets by email although we are members. Also what happen to the food tickets for sept 8. Asha mhatre, y.mhatre @com cast.net

    Reply
    • SMM Webmaster
      August 31, 2019 8:09 AM

      Food coupon sale for Sept 8 has now been started. We are sending out email update in some time now.

      Reply
  • What’s the menu for lunch? 🙂

    Reply
    • वरण भात साजूक तूप
      बटाट्याच्या भाजीला रस्सा खूप
      टपोरे काळे चणे मस्त
      नुसतं लोणचंच नका करू फस्त
      टरटरीत फुगलेल्या पुरीची साथ
      मागोमाग ताटात मसालेभात
      चमचमीत बटाटवडे इवलुले
      उकडीचे मोदक तुपात न्हालेले.
      सगळं झाल्यावर थंडगार मठ्ठा
      अजून आहे एक गोड सरप्राईज, ते सांगत नाही अत्ता

      Reply
  • need a ride on Nov 19 (Tue) from (overlake hospital) Bellevue to Bothell at 3 pm. Your help is appreciated.

    Reply
    • Namaskaar Anantji,

      We request you to post such kind of posts on our facebook group. You will get a better response there.

      Reply

Leave a Reply