गर्जना ढोल पथक आणि लेझीम पथक

गर्जना ढोल पथक

“ढोलचा ठोका आणि लेझीमचा खळखळाट,
ध्वज संस्कृतीचा नाचवू, टाळ-झांजांच्या गजरात”

गणेशोत्सवासाठी SMM मुलांचे ढोल पथक तयार करत आहे. पथकात ढोल बरोबरच लेझीम, टाळ, झांजा, ध्वज वगैरेचा समावेश असेल. या खेळांमधून आपली परंपरा जपली जावी, कलागुणांना वाव मिळावा व मुलांच्या ऊर्जेला योग्य दिशा मिळावी हा मंडळांचा मुख्य हेतू आहे.

 

वयोगट: 6 ते 18 वर्षे  

ह्या वयोगटातील सहभागी मुले / मुली गणेशोत्सवातील मिरवणुकीमध्ये ढोल पथकाचे सादरीकरण करतील. मोठी मुले ढोल वाजवतील, छोटी मुले टाळ, लेझीम वगैरे मध्ये सहभागी होऊ शकतात आणि छोटे ध्वज नाचवू शकतात. SMM कडून मुलांना प्रशिक्षण दिले जाईल.

  • जून 2022 च्या तिसऱ्या आठवड्यापासून सराव सत्र (practice sessions) सुरु होईल.
  • पथकात सहभागी होण्यासाठी SMM चे सभासद असणे आवश्यक आहे.
  • ज्या मुलांना पथकात सामील व्हायचे आहे त्यांनी खालील गुगल प्रवेशिका भरून द्यावी.
चला तर मग! जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आजच आपल्या मुलांची नावे नोंदवा.

लेझीम पथक

लेझिम चाले मंडल धरुनी, बाजुस-मागे, पुढे वाकुनी
छनछन, खळखळ, झणझण, झिनखळ
लेझिम चाले जोरात !

SMM या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी मोठ्यांचे (स्त्री / पुरुष – वयोगट 18+) लेझीम पथक बनवत आहे. इच्छुकांनी खालील गुगल प्रवेशिका भरून द्यावी.

पथकात सहभागी होण्यासाठी SMM चे सभासद असणे आवश्यक आहे.

Date/Time
Wed Jul 06, 2022 - Fri Aug 05, 2022
5:15 AM to 5:30 AM

Address


, Map Unavailable

Leave a Reply