मेहफिल सिॲटल्-करांची

 

मंडळी,

घरी बसून बसून कंटाळलात ना? सिॲटल् मध्ये लॉकडाऊन सुरु होऊन आता साधारण ५ आठवडे व्हायला आले आहेत आणि आम्हाला कल्पना आहे की आमच्या सारखेच तुम्ही पण पहिल्यांदा थोडासा अविश्वास, मग भीती, चिडचिड, दुःख, स्वीकृती आणि सर्वात शेवटी आशावाद अश्या वेगवेगळ्या भवनातून गेला असणार. स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घेत असणार. अशीच आपली काळजी घेत रहा.

खरं म्हणजे हे सगळे जेंव्हा सुरु झाले तेंव्हा नक्की काय होतंय, किती दिवस चालणार, आता काय करायला हवे वगैरे बरेच विचार डोक्यात गर्दी करत होते  आणि या उद्भवलेल्या परिस्थितीशी जमवून घेण्यातच बऱ्यापैकी वेळ निघून गेला. दरम्यानच्या काळात शारीरिक स्वास्थ्याबरोबरच, मनाचं स्वास्थ्य सांभाळण्यासाठी बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. Unapproachable लोकं अगदी उठसुठ समोर यायला लागली. कित्येक कलाकारांच्या, मोठ्या असामींच्या, virtually का होईना, अगदी घरातपण आपल्याला प्रवेश मिळाला. पण या सगळ्यात झालं काय? आपल्या सवयीचे, नेहमीचे, रोज आसपास वावरणारे चेहरे मात्र पुसट होत गेले आणि त्यांचीच कमतरता आपल्याला सगळ्यात जास्त जाणवू लागली.

आजच्या ह्या परिस्थिती अजून थोडे दिवस तरी सिॲटल्-करांची प्रत्यक्ष भेट होणं कठीण आहे. भेट नाही, तर मग निदान लोकांना virtually एकत्र येऊन काहीतरी करता येईल का, असा प्रश्न आम्हां कमिटीकरांना पडला आणि मग आम्ही ठरवलं की तुम्हालाच विचारून बघूया.

त्याचे असे आहे की सद्यपरिस्थितीत वेगवेगळ्या कला भरपूरप्रमाणात ऑनलाईन दाखवल्या आणि शिकवल्या जात आहेत. आमची ईच्छा होती की आपल्या कम्युनिटीमधल्या कोणाला अशीच आपली कोणती कला, छंद, व्यासंग जर सिॲटल् मधल्या हौशी आणि रसिक मंडळींसमोर virtually सादर करायची असेल किंवा अशी काही गोष्ट आहे जी मंडळी आपापल्या घरून एकाचवेळी तुमच्या मार्गदर्शनाखाली करू शकतील तर त्या साठी एक आभासी (म्हणजे virtual बर का) व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं. मग कोणाला त्यांची लिहिलेली एखादी कथा वाचायची असेल, गाणं म्हणायचं असेल, छोटासा नाच शिकवायचा असेल, रेसिपी शिकवायची असेल, मुलांसाठी काही गायडन्स द्यायचा असेल, अश्या  काही भन्नाट कल्पना असतील तर अगदी संकोच न बाळगता पटकन ह्या गुगल फॉर्मद्वारे आम्हाला कळवा आणि आम्ही प्रयत्न करू आपल्याला ह्या मेहेफीलीत सामिल करून घ्यायचा.

नुकत्याच गेलेल्या रविवारी कादंबिनी ताईंनी जसं  सूर्य नमस्काराचं प्रात्यक्षिक देऊन ह्या virtual गाठीभेटीं ची छानशी सुरुवात करून दिली आणि तुम्ही सर्वांनी ४०० च्या वर सूर्यनमस्कार घालून त्याला छानसा प्रतिसादही दिलात. तसेच आता आमची ईच्छा आहे की आपल्या सहभागाने ह्याच धरतीवर आणखी काही असेच कार्यक्रम आयोजित करावे. अट फक्त एवढीच आहे की अशी सेशन्स सादर करणारी व्यक्ती इथे सिॲटल् मध्ये असावी आणि जेव्हडे जमेल तेव्हडे हे सेशन्स रियल टाइम असावे.

काय मग? होऊन जाऊदे. मेहफिल सिॲटल्-करांची!!!

Live Streaming Sign up form link:  https://forms.gle/xFCWek2pwipRwFjK7

During this quarantine time SMM would like to bring this opportunity to our members who are interested in showcasing their talent by doing live streaming on our Facebook group.

It can be anything from Fitness related program, Cooking, Story telling, Kavita vachan, Singing, Music, Stand up, a Short Play, Tax related benefits. Content should be appropriate for our SMM members. For managing the live stream our programming and media team will work with you offline.

 

 

Date/Time
Sun Aug 09, 2020 - Mon Aug 31, 2020
12:00 AM

Address
Seattle Maharashtra Mandal
7345 164th AVE NE SUITE 145 PMB#113
Redmond, WA 98052

Loading Map....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.

Menu