BMM २०२६ तिकीट विक्री – चार टप्पे:
बीएमएम२०२६ स्नेहसंमेलनासाठी तिकीट विक्रीचे एकूण चार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत :
१. मकर संक्रांत ते गुढीपाडवा
२. गुढीपाडवा ते महाराष्ट्र दिन
३. महाराष्ट्र दिन ते ४ जुलै (अमेरिकेचा चा स्वातंत्र्यदिन)
४. ४ जुलै ते स्नेहसंमेलन शुभारंभ दिनांक (६ ऑगस्ट)
प्रत्येक पुढील टप्प्यात तिकीट दर वाढत जाणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी पहिल्या टप्प्यातील कमी दराचा लाभ घेत, शक्य तितक्या लवकर तिकिटे खरेदी करावीत. यामुळे तुम्हाला मुख्य प्रेक्षागृहात पुढील रांगेत बसण्याची संधी मिळू शकते. तसेच, मित्र -मैत्रीणींबरोबर एकत्र बसण्याची बैठकव्यवस्था हवी असल्यास, तुमच्या शहरातील मराठी मंडळाशी संपर्क साधावा. अन्यथा, स्नेहसंमेलनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून थेट नोंदणी करता येईल: https://bmmseattle2026.org/bmm2026
कार्यक्रमांची घोषणा
प्रमुख वक्त्या: डॉ. माधुरी कानिटकर – पहिल्या मराठी सेवा-निवृत्त लेफ्टनंट जनरल.
भारतीय सेनेतील सर्वोच्च शिखरांपासून ते विद्यापीठाच्या नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार, अनुभव आणि नेतृत्वकथा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत.
मराठी नाटक – ‘ऑल दि बेस्ट’
- ऑल दि बेस्ट, करमणुकीसाठी आंधळेपणाने विश्वास टाकावा असे, असंख्य प्रेक्षकांच्या मनात घर केलेले सुपरहिट नाटक आता पाहायला मिळणार आहे BMM2026 Seattle मध्ये! अशा भन्नाट आणि बेस्ट moments अनुभवायला हे धमाल नाटक चुकवू नका. आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह या आणि भरपूर हास्य, मनोरंजन आणि रंगमंचाचा जादू अनुभवायला तयार रहा! BMM अधिवेशनात भारतातनू येणाऱ्या मराठी नाटकाचे चार वर्षांनंतर पुनरागमन होत आहे!
सांगीतिक कार्यक्रम – ‘The Folk आख्यान’
- ३०+ कलाकारांनी सादर केलेला, महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककला, परंपरा आणि सुरेल संगीताचा एक अभूतपूर्व, अद्वितीय सांस्कृतिक प्रवास.
माय मराठीचा गौरव
या विभागांतर्गत दोन विशेष कार्यक्रम:
१. गोष्ट इथे संपत नाही – शिवआख्यान मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासातील शौर्य, धैर्य आणि चातुर्याचे प्रभावी कथाकथन.
२. मधुरव – बोली ते ब्लॉग
प्रमुख कलाकार: मधुरा वेलणकर–साटम
या कार्यक्रमात दृक्-श्राव्य माध्यमातून मराठी भाषेचा इतिहास, साहित्य, सांस्कृतिक वारसा, सामर्थ्य आणि उत्क्रांती अत्यंत रंजक व प्रभावी पद्धतीने उलगडून दाखवण्यात येणार आहे.
‘संगीत रजनी’ अंतर्गत
• आरती अंकलीकर–टिकेकर आणि रघुनंदन पणशीकर, शास्त्रीय संगीत व नाट्यसंगीताची सुरेल मैफल.
• अविनाश–विश्वजीत आणि निलेश मोहरीर, नव्या उमेदीच्या संगीतकारांचा धमाकेदार संगीत सोहळा.
• मस्तीची मधली सुट्टी – सादरकर्ते पारितोषिक विजेते, प्रख्यात संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी, खास मुलांसाठी
• कॅंडल लाइट कॉन्सर्ट – शुभंकर कुलकर्णी, भाषा बदलतात, पण सूर तो राहतो. युवा पिढीसाठी खास, ऊर्जेने भरलेला कार्यक्रम!
कला–स्पंदन कलादालन
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध व पुरस्कारप्राप्त चित्रकार सुचित्रा भोसले आणि प्रमोद कुर्लेकर प्रात्यक्षिके आणि ‘कलाकारासोबत संवाद – कॅनव्हासच्या पलीकडून’ या विशेष उपक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी: bmmseattle2026.org/kalaspandan-artgallery
उत्तर अमेरिकेत प्रथमच सादर होणारे कार्यक्रम
• संगीत वस्त्रहरण (रॅले) – लोकप्रिय धमाल विनोदी नाटक
• मोगरा फुलला (लॉस एंजेलस) – गो.नी. दांडेकरांच्या साहित्याचे दृक्-श्राव्य वाचन
• हसू बाई जोरात (बे एरिया) – ११ महिलांची स्टँड-अप कॉमेडी
• सत्यजीत लिमये प्रस्तुत वाद्यसंगम (सिॲटल्) – २५ वादकांचा भव्य ताफा
स्पर्धा विभाग:
उत्तर अमेरिकेतील अनेक गुणी कलाकारांसाठी सुवर्णसंधी – BMM 2026 स्वरमंच गायन स्पर्धा! हा मंच आहे उदयोन्मुख आणि प्रस्थापित गायकांसाठी, समूहांसाठी आणि प्रत्येक वयोगटासाठी.
मार्गदर्शक व परीक्षक: प्रख्यात संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी
एकल व समूहगीत स्पर्धेसाठी नोंदणी व ऑडिशन सादर करण्याची अंतिम तारीख: १५ मार्च २०२६
प्रश्नांसाठी: naprogramsmusic@bmmseattle2026.org
इतर स्पर्धा
● स्मरणिका – कथा व मुखपृष्ठ स्पर्धा
● नांदा हास्य भरे – स्टँडअप कॉमेडी
● नृत्य झंकार – शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्य
● नाच गं घुमा, नाच रे पोरा – लोकनृत्य
● चला मंगळागौर खेळूया
● रंग महाराष्ट्राचे – ज्युरिड कला दालन
सर्व स्पर्धांची माहिती:
https://bmmseattle2026.org/competitions
👦 बालकलाकारांसाठी विशेष कार्यक्रम :
गुरुवार – Day Zero साठी बालकलाकारांचे विशेष
कार्यक्रम आयोजत करण्यात आले असून, सर्व स्थानिक मराठी
शाळांचा सहभाग असणार आहे. सहभागासाठी त्वरित अर्ज करा :
👉 bmmseattle2026.org/baltarang-kishorekunj
आपल्या योगदानातून हे स्नेहसंमेलन अधिक भव्य, समृद्ध आणि संस्मरणीय बनेल. मराठी संस्कृतीच्या या महोत्सवाला आपला हातभार जरूर लावा.