Sr. Citizens’ meetup

सिअ‍ॅटलचा आल्हाददायक उन्हाळा सार्‍यांनाच हवाहवासा वाटतो.
सुट्टीचे बेत आखले जातात, भारतातून पालक येतात, पाहुण्यांची वर्दळ आणि पाहुणचाराची लगबग सुरू होते. गप्पा- गोष्टी-हास्यविनोदांची मैफल सजते.
अशाच एका उन्हाळी दुपारी आम्ही मस्त कार्यक्रम घेऊन येत आहोत आमच्या खास सभासदांसाठी – “वयाने ज्येष्ठ पण उत्साहाने श्रेष्ठ” अशा आयुष्याच्या उत्तररंगात रंगलेल्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी!!
आपले छोटे दोस्त उन्हाळी शिबिरात काही नवनवीन गोष्टी शिकणार आहेत. त्यांना तुम्हाला ते सर्व सांगायचे आहे.
याव्यतिरिक्त मंडळानेही करमणुकीच्या कार्यक्रमाची तयारी केली आहे. या मोठ्या मंडळींच्या कार्यक्रमात स्थानिक मित्रमंडळी तर आहेतच पण परगावांहून आलेले आपले पालकही सहभागी होऊ शकतात.
चला तर मग. आम्हांला आपल्या उपस्थितीबद्दल अवश्य कळवा.

It is free event for all Sr. Citizens and Visiting parents of members. Please RSVP ASAP, it will help us to plan the event.

Date/Time
Sun Aug 06, 2017
2:00 PM to 5:00 PM

Address
Eastside Bahai Center
16007 NE 8th St Ste 100
Bellevue, Washington 98008

Loading Map....

Leave a Reply