मुलांची उन्हाळी कार्यशाळा (Kids Camp – Age 5 – 12 Years)

 

Kidscamp-final
Last Year’s kids camp picture (2015)

 

मुलांची उन्हाळी कार्यशाळा—- मस्तीची पाठशाळा

संपली शाळा एकदाची , लागली सुट्टी उन्हाळ्याची !!
सोबत सतत मित्र मैत्रिणी , वेळ खूप मजा मस्तीची !!

सिअॅटल महाराष्ट्र मंडळ मुलांसाठी खास घेऊन येत आहेत “ मुलांची उन्हाळी कार्यशाळा” म्हणजेच Kids Camp.

खूप मजा आणि मस्ती सोबतच मुलांना काही नवीन कलागुणांची ओळख करून देण्यात येईल. मुलांना मातीच्या विविध गोष्टी तसेच मातीचे गणपती बनवायला शिकवले जातील.  भारतातून आलेले आजोबा मुलांना ओरिगामीच्या वेगवेगळ्या वस्त्तु बनवायला शिकवतील.  काही विशेष भारतीय खेळही घेतले जातील. गम्मत मजा मस्ती च्या वातावरणात मुलांना काही चटपटीत खाद्यपदार्थ ही शिकवले जातील. आणि सर्व बालगोपाळांचे  सहभोजन होईल.

एवढेच ?

नक्कीच नाही ….. अजून  शिल्लक आहे ….. गाण्यावर पाय थरारल्या शिवाय काय मजा ?
मुलांना खास नृत्य शिकवून  त्या नृत्याच्या धडाकेबाज प्रयोगाने कार्यशाळेची सांगता होईल.

कार्यशाळा दिनांक ९ जुलै रोजी सकाळी १०:३० ते ४ ह्या वेळात असेल.
ठिकाण : Highland Community Center
शुल्क : $४० सभासदांसाठी आणि $५०  सभासद नसलेल्यांसाठी. Click here to make payment.
तूम्हाला इमेल द्वारे माहिती कळवण्यात येईल.. ह्या इमेल मध्ये सहभागासाठी भरावयाच्या फॉर्मसाठीची लिंक असेल. त्यावर टिचकी मारून कृपया तो फॉर्म भरून द्यावा.

Date/Time
Sat Jul 09, 2016
10:30 AM to 4:00 PM

Address
Highland Community Center
14224 Bel Red Road
Bellevue, WA 98007

Loading Map....

Leave a Reply